कहाणी – एका ज्ञानपिपासू तपस्विनीची
१९३४ सालची गोष्ट. एका १६ वर्षांच्या उपवर मुलीचे लग्न ठरले अन् त्याप्रमाणे नाशिक क्षेत्री झाले पण. त्यावेळचे ऑल इंडिया रिपोर्टरचे संचालक श्री रा.रा. वामनराव चितळे, हे होते वरपिता. वर चि. दिनकर, वकील अन् ‘युवराज’, तर वधू होती मराठी लेखक श्री. वि.मा.दी. पटवर्धन यांची एकुलती एक भगिनी, व शेंडेफळ चि. सौ. कां. श्यामला. मुलीच्या जन्मानंतर अल्पावधीतच …